Anuradha Vipat
उतारवयात शरीरातील रक्तवाहिन्या कडक होणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि उच्च रक्तदाब यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयविकार आणि हार्ट अटॅकचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
वृद्धत्वाचा हा काळ आनंदी आणि निरोगी घालवण्यासाठी हृदयाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
६० वर्षांनंतर शरीरातील बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी नियमित तपासणी करणे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.
दरमहा रक्तदाब आणि रक्तातील साखर तपासा. वर्षातून किमान दोनदा लिपिड प्रोफाईल चाचणी करून घ्या.
उतारवयात पचनशक्ती कमजोर होते, त्यामुळे आहाराबाबत कडक शिस्त पाळणे गरजेचे आहे. फायबरयुक्त पदार्थ, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि ओट्स यांचा समावेश करा.
दिवसातून ३० मिनिटे संथ गतीने फिरायला जा . हे हृदयासाठी सर्वोत्तम मानले जाते. हलके योगासन, प्राणायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने सौम्य व्यायाम करा.
उतारवयातील मानसिक तणाव, चिंता आणि एकटेपणाचा हृदयाच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होतो. ताण कमी करण्यासाठी दररोज ध्यान करा किंवा संगीत ऐका.