Anuradha Vipat
लहान मुलांना हिरव्या पालेभाज्या आणि सेंद्रिय अन्न खाण्याची सवय लावणे हे आजकालच्या जंक फूडच्या युगात पालकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे.
काही सोप्या आणि प्रभावी उपायांचा वापर करून तुम्ही त्यांना कोणतीही बळजबरी न करता आवडीने भाज्या खायला लावू शकता.
पालक, मेथी किंवा कोथिंबीर उकळून त्याची प्युरी बनवा आणि ती कणिक मळताना वापरा. यामुळे रंगीबेरंगी आणि पौष्टिक पराठे किंवा पुऱ्या तयार होतील.
दुधी भोपळा, गाजर, कोबी बारीक किसून ते पराठ्यामध्ये किंवा कटलेटमध्ये लपवून मुलांना खाऊ घाला.
मैद्याच्या बेसऐवजी गव्हाचा किंवा नाचणीचा बेस वापरून घरच्या घरी पिझ्झा बनवा आणि त्यावर शिमला मिरची, ब्रोकोली, कॉर्न आणि सेंद्रिय टोमॅटोचे भरपूर टॉपिंग्ज टाका.
भाज्यांचे वेगवेगळे आकार कापण्यासाठी कुकी कटरचा वापर करा.
ताटामध्ये डोसे किंवा उत्तप्पा बनवताना भाज्यांचा वापर करून स्मायली फेस किंवा कार्टून कॅरेक्टर बनवा. यामुळे मुले आनंदाने जेवण संपवतील.