Silage Production: मुरघास निर्मितीतून उभा करा व्यवसाय; कोणती यंत्रे लागतात?

Swarali Pawar

मुरघास निर्मितीचा व्यवसाय

दुष्काळात चारा टंचाई टाळण्यासाठी मुरघास महत्त्वाचा आहे. मुरघास निर्मिती आणि विक्री हा शेतकऱ्यांसाठी चांगला व्यवसाय पर्याय ठरू शकतो. यासाठी काही यंत्रांचा वापर करता येतो.

Silage Production Business | Agrowon

चारा कापणी यंत्र

हे यंत्र मका, ज्वारी आणि बाजरीचा चारा कापून बारीक करते. चाऱ्याचे साधारण १५ ते २० मिमी लांबीचे तुकडे होतात. ट्रॅक्टरला जोडलेले किंवा स्वयंचलित यंत्र उपलब्ध असते.

Fodder Harvester | Agrowon

सायलेज बेलर

या यंत्राद्वारे बारीक केलेला हिरवा चारा दाबून गोल किंवा चौकोनी गठ्ठे तयार केले जातात. हायड्रोलिक दाबामुळे चाऱ्यातील हवा बाहेर काढण्यास मदत होते. गठ्ठ्यांचे वजन साधारण ५० ते १०० किलो असू शकते.

Silage Baler | Agrowon

सायलेज रॅपर

बेलरने तयार केलेल्या गठ्ठ्याभोवती हे यंत्र विशेष एलएलडीपी स्ट्रेचेबल प्लास्टिक फिल्म गुंडाळते. फिल्मचे साधारण ४ ते ६ थर गुंडाळल्याने गठ्ठा हवाबंद होण्यास मदत होते.

Silage Wrapper | Agrowon

मिनी सायलेज बेलर

लहान शेतकऱ्यांसाठी मिनी सायलेज बेलर उपयुक्त ठरते. या यंत्राद्वारे साधारण ५० ते ६० किलो वजनाचे चाऱ्याचे गठ्ठे तयार करता येतात. लहान प्रमाणात मुरघास निर्मितीसाठी हा पर्याय आहे.

Mini silage Baler | Agrowon

ऑटोमॅटिक बेलर आणि रॅपर

या यंत्रात चाऱ्याचे गठ्ठे तयार करणे आणि त्यांना प्लास्टिक फिल्मने गुंडाळणे ही कामे एकाच प्रक्रियेत होतात. त्यामुळे वेळ आणि मजुरीची बचत होते. मोठ्या डेअरीसाठी हा पर्याय उपयुक्त ठरतो.

Automatic Baler And Wrapper | Agrowon

सायलेज बॅगिंग मशीन

या यंत्राद्वारे चारा मोठ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून हायड्रोलिक दाबाने पॅक केला जातो. लहान आणि मध्यम पशुपालकांसाठी ५० किलोच्या पिशव्या साठवणूक आणि वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरतात.

Silage Bagging Machine | Agrowon

बेल ग्रॅबर किंवा लोडर

मोठे सायलेज गठ्ठे उचलण्यासाठी आणि त्यांची वाहतूक करण्यासाठी बेल ग्रॅबर किंवा लोडर वापरले जाते. त्यामुळे गठ्ठ्यांची हाताळणी कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात करता येते.

Bale Grabber and Loader | Agrowon

Dushkal Keli Lagwad: दुष्काळात कांदेबाग केळीची लागवड करताना या ७ गोष्टी तपासा, मिळेल शाश्वत उत्पादन

Agrowon
अधिक माहितीसाठी..