Swarali Pawar
पाऊस लांबल्याने आणि उन्हाचा तडाखा वाढल्याने जनावरांवर ताण वाढतो. उष्माघात, चाऱ्याची टंचाई आणि उत्पादन घटण्याचा धोका निर्माण होतो.
एक कटाई आणि बहु कटाईची चारा पिके तातडीने लावावीत. कमी कालावधीत तयार होणाऱ्या चाऱ्याला प्राधान्य द्यावे.
हिरव्या चाऱ्याचा मुरघास करून साठवणूक करावी. चाऱ्यात २% युरिया मिसळल्यास अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
बिनकाटेरी निवडुंग कमी पाण्यात वाढतो आणि पौष्टिक असतो. दुष्काळी परिस्थितीत तो चांगला पर्याय ठरू शकतो.
दुभत्या जनावरांना दररोज ३० ते ४० लिटर स्वच्छ पाणी लागते. दिवसातून ३ ते ४ वेळा थंड आणि स्वच्छ पाणी द्यावे.
पाण्यात खनिज मिश्रण किंवा इलेक्ट्रोलाइट्स मिसळावेत. यामुळे शरीरातील क्षारांचे संतुलन राखण्यास मदत होते.
जनावरांना थेट उन्हात बांधू नका. गोठा हवेशीर ठेवा आणि शक्य असल्यास पंखे किंवा फॉगर्स वापरा.
धापा टाकणे, लाळ गळणे किंवा खाणे-पिणे बंद करणे ही धोक्याची चिन्हे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.