Anuradha Vipat
श्रावण सोमवारी शंकराला विशिष्ट धान्य अर्पण करण्याची प्रथा आहे.
प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवमूठ वाहिली जाते.
श्रावणात पूजेसाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण असलेले पंचामृत असायला हवे तसेच कुमकुम देवतेच्या चरणावर अर्पण करण्यासाठी हवेचं
देवतेला अर्पण करण्यासाठी अक्षता व पूजेसाठी सुगंधित फुले हवी.
श्रावणात पूजेसाठी नैवेद्य म्हणून एखादे फळ किंवा मिठाई आणि विष्णू देवाला प्रिय असलेली तुळशीची पाने हवीतचं.
पूजा करताना घरात सुगंध आणि प्रकाश पसरवण्यासाठी धूप-दीप आणि शुद्धीकरणासाठी गंगाजल असायला हवे.
महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्र, पूजेच्या वेळी वाजवण्यासाठी शंख-घंटी आणि तांब्या-पंचपात्री असे गरजेचे आहे