Anuradha Vipat
गणेश चतुर्थी दिवशी घरामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात. चला तर मग आज आपण पाहूयात गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी आपल्याजवळ कोणकोणते साहित्य असायला हवे.
पूजेमध्ये अर्पण करण्यासाठी फळे, सुपारी, नारळ, विड्याची पाने, पूजेमध्ये देवाला वाहण्यासाठी अक्षता. आणि आरतीसाठी कापूर हवाचं
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी गणपतीची मूर्ती आणि मूर्ती ठेवण्यासाठी चौरंग किंवा पाट हवा
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी गणपतीला अर्पण करण्यासाठी प्रणव व शुभचिन्हे हवीत
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी पूजेच्या सर्व वस्तू एकत्र ठेवण्यासाठी पूजा थाळी हवी.
गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी कलश व पाणी तसेच दिवे व समई , उदबत्ती व धूप आणि देवतेला लावण्याचे शुभ रंग म्हणजेच हळद, कुंकू, गुलाल हवा.
गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा, गणपतीला वाहण्यासाठी फुले, गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी गणपतीचे आवडते मोदक हवेचं