Anuradha Vipat
गरोदरपणात आई आणि बाळाच्या वाढीसाठी शरीरात रक्ताचे प्रमाण सुमारे ५०% ने वाढते, त्यामुळे लोहाची गरज दुपटीने वाढते.
हिमोग्लोबिनची पातळी सामान्य (किमान ११ g/dL पेक्षा जास्त) राखण्यासाठी खालील काळजी घ्यावी.
पालक, मेथी, शेपू, राजगिरा आणि अळूची पाने यांसारख्या हिरव्या पालेभाज्या नियमित खाव्यात.
मोड आलेली मटकी, मूग, चणे, राजमा, सोयाबीन, तसेच नाचणी आणि बाजरी यांचा आहारात वापर करावा.
खजूर, काळे मनुके, अंजीर, बदाम, अक्रोड तसेच भोपळ्याच्या आणि तीळाच्या बिया (लाडू किंवा चटणी स्वरूपात) खाव्यात.
बीट, डाळिंब, सफरचंद आणि गूळ-शेंगदाणे यांचे सेवन फायदेशीर ठरते.
तुम्ही मांसाहार करत असाल तर अंडी, चिकन आणि मासे यांमधून शरीराला सहज शोषले जाणारे लोह मिळते.