Team Agrowon
जनावरांना नियमितपणे लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजारांचं प्रमाण कमी होऊन अपेक्षित उत्पादन मिळवणं शक्य होत.
पावसाळ्यापूर्वी मोठ्या जनावरांमध्ये घटसर्प, फऱ्या, फाशी आणि सांसर्गिक गर्भपात या आजारांविरुद्ध तर शेळ्या-मेंढ्यामध्ये पीपीआर, आंत्रविषार, देवी आणि घटसर्प या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण कराव.
आजाराचा संसर्ग होण्यापूर्वी लसीकरण करण अत्यंत गरजेचं आहे. कारण लस दिल्यानंतर जनावरांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी किमान १५ दिवस लागतात. त्यामुळे आजार झाल्यानंतर किंवा साथ आल्यानंतर लसीकरण करण फायद्याच ठरत नाही.
लसीकरण करण्यापूर्वी सर्व जनावरांना एक आठवडा आधी जंतनाशकाची मात्रा द्यावी. यासोबतच जनावरांच्या शरीरावरील तसेच गोठ्यातील गोचीड, गोमाशी यांचाही बंदोबस्त करावा. त्यामुळे लसीकणाचा योग्य फायदा होतो.
जनावरांना आहारातून क्षार मिश्रणांचा आणि जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा. त्यामुळे टोचलेल्या लसीमुळे जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होऊन चांगले परिणाम मिळतात.
आंत्रविषार, घटसर्प आणि एक टांग्या किंवा फऱ्या या रोगावरची लस जनावराला मे ते जून महिन्यात म्हणजेच पावसाळ्यापूर्वी द्यावी. तोंडखुरी रोगावरची लस दरवर्षी मार्च, एप्रिल किंवा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत द्यावी.
शेळ्यांतील पीपीआर या रोगावरची लस मे, जून किंवा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात द्यावी. याशिवाय लम्पी सारख्या आजारावर दरवर्षी लसीकरण करण आवश्य आहे.
Papaya Summer Threat : कडक उन्हात पपई बागेत काय काळजी घ्याल?