Anuradha Vipat
उपवासात 'इन्स्टंट एनर्जी' देणारे खालील पदार्थ तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा.
पोटॅशियम आणि कर्बोदकांचा उत्तम स्रोत असल्यामुळे केळे खाल्ल्यानंतर लगेच ऊर्जा मिळते.
यात इलेक्ट्रोलाईट्स भरपूर असतात, जे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवतात आणि थकवा दूर करतात.
खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते जी रक्तातील ऊर्जा वाढवते.
साबुदाण्यापेक्षा राजगिरा पचायला हलका आणि लोह तसेच कॅल्शियमने समृद्ध असतो.
उकडलेले रताळे खाल्ल्याने शरीराला संथ गतीने ऊर्जा मिळते.
उपवासात पचन संस्था थंड ठेवण्यासाठी आणि प्रोबायोटिक्स मिळवण्यासाठी दही सर्वोत्तम आहे.