Anuradha Vipat
सकाळी उपाशीपोटी योग्य पदार्थ खाल्ल्याने पचन सुधारण्यास, ऊर्जा मिळण्यास आणि आरोग्य चांगले ठेवण्यास मदत होऊ शकते
रात्री भिजवून ठेवलेले 4 ते 6 बदाम सकाळी खाल्ल्यास शरीराला चांगले फॅट्स, प्रोटीन आणि जीवनसत्त्वे मिळू शकतात.
केळी, सफरचंद, पपई, डाळिंब किंवा मोसंबी यांसारखी फळे सकाळी खाण्यासाठी उत्तम पर्याय मानली जातात.
मनुक्यांमध्ये नैसर्गिक साखर, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.
मूग, मटकी किंवा इतर अंकुरित कडधान्ये प्रोटीन, फायबर आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध असतात.
दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात.
नारळपाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि त्यामध्ये विविध खनिजे असतात.