Anuradha Vipat
घरात प्राथमिक उपचार पेटी असणे हे आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
घरात अचानक हात भाजणे, चाकू लागणे किंवा पाय घसरून पडणे अशा घटना घडतात. अशा वेळी घरात पेटी असेल, तर लगेच मलमपट्टी करता येते.
दुखापत झाल्यानंतर फर्स्ट एड बॉक्समधील बँडेज किंवा कॉटनमुळे रक्तस्त्राव वेळीच थांबवून संसर्ग होण्याचा धोका टाळता येतो.
घरात सर्व आवश्यक औषधे एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत, हे माहीत असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत घरातील सदस्यांची धांदल उडत नाही
किरकोळ खरचटणे, मुका मार लागणे किंवा डोकेदुखीसाठी प्रत्येक वेळी दवाखान्यात धाव घ्यावी लागत नाही.
दर ६ महिन्यांनी पेटीतील औषधांची अंतिम तारीख तपासा आणि कालबाह्य झालेली औषधे बदलून घ्या.
पेटीवर जवळच्या डॉक्टर, रुग्णवाहिका आणि मेडिकल स्टोअरचा फोन नंबर लिहून ठेवावा.