Anuradha Vipat
बसण्याची चुकीची पद्धत आपल्या पाठीच्या कण्यावर आणि स्नायूंवर अतिरिक्त ताण टाकते.
बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाठदुखी, मानेचा कडकपणा आणि पचनक्रियेच्या गंभीर समस्या निर्माण होतात.
आजकाल कॉम्प्युटर किंवा मोबाईलसमोर तासनतास वाकून बसण्याच्या सवयीमुळे तरुणांमध्ये हा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
पुढे वाकून किंवा बाक काढून बसल्याने पाठीच्या कण्यातील गादीवर जास्त दाब पडतो. यामुळे तीव्र कंबरदुखी सुरू होते
तासनतास मान पुढे झुकवून स्क्रीनकडे पाहिल्याने मानेच्या स्नायूंवर ताण येतो.
सतत वाकून बसल्याने खांदे पुढच्या बाजूला झुकतात ज्यामुळे शरीराचा नैसर्गिक आकार बिघडतो.
पोट दाबून किंवा वाकून बसल्याने पचनसंस्थेचे अवयव दबले जातात. यामुळे अन्न नीट पचत नाही.