Aslam Abdul Shanedivan
कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळत आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, छावा क्रांती संघटना आक्रमक
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकरी आणि शेतकरी संघटना एकवटल्या. संघटांकडून संयुक्त एल्गार महामेळावा घेण्याची घोषणा करण्यात आली.
जानेवारी महिन्यात एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू हे मार्गदर्शन करणार.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्यातबंदीमुळे ३५०० ते ४००० रुपये विकला जाणारा कांदा १५०० ते १६०० रुपयांवर आला आहे. ज्याचा मोठा फटाका कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदांराना बसत आहे.
केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणामुळे वातावरण तापले असून कांदा उत्पादकांचा राज्यव्यापी संयुक्त एल्गार मेळावा होणार आहे.
या धोरणाविरोधात वेग वेगळे न लढता सर्व शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन लढा देणार आहेत.