Mango Cake Recipe : 'या' आंब्याच्या सिझनमध्ये बनवा आंब्याचा तोंडाला पाणी आणणारा 'मँगो रवा केक', पाहा रिसिपी

Anuradha Vipat

सोपी रेसिपी

या आंब्याच्या सिझनमध्ये घरच्या घरी मऊ आणि रसाळ 'मँगो रवा केक' बनवण्याची ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.

Mango Cake Recipe | agrowon

केक

तुम्ही हा 'मँगो रवा केक' बनवण्यासाठी ओव्हनची गरज नाही, तुम्ही तो कढईतही बनवू शकता.

Mango Cake Recipe | agrowon

साहित्य

आंब्याचा रस , बारीक रवा, साखर, तेल किंवा साजूक तूप, दूध, बेकिंग पावडर,बेकिंग सोडा,ड्राय फ्रूट्स.

Mango Cake Recipe | agrowon

बॅटर

मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा रस, साखर आणि तेल एकत्र करून आता यात रवा टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवा. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि २० ते ३० मिनिटे झाकून ठेवा.

Mango Cake Recipe | agrowon

बेकिंग

३० मिनिटांनंतर मिश्रण खूप घट्ट वाटल्यास त्यात थोडे दूध घालून 'रिबन कन्सिस्टन्सी' करून घ्या. गॅसवर एक मोठी कढई ठेवा, त्यात मीठ किंवा स्टँड ठेवा आणि झाकण ठेवून १० मिनिटे प्री-हीट करा.

Mango Cake Recipe | agrowon

मिक्स

केकच्या भांड्याला तूप लावून ग्रीस करा आणि थोडा मैदा भुरभुरा.  बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने एकाच दिशेने मिक्स करा.

Mango Cake Recipe | agrowon

बेकिंग

कढईत केकचे भांडे ठेवा आणि मंद आचेवर ३५ ते ४५ मिनिटे बेक होऊ द्या. टूथपिक टाकून तपासा; ती स्वच्छ बाहेर आली तर केक तयार आहे.

Mango Cake Recipe | agrowon

Mango Eating Precautions : आंबा खाताना कोणती काळजी घ्याल?

Mango Eating Precautions | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...