Anuradha Vipat
अंड्याचे पिवळे बलक खावे की नाही, हा आरोग्य जगतात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे.
निरोगी व्यक्तींनी अंड्याचे पिवळे बलक नक्कीच खावे, कारण ते अत्यंत पौष्टिक असते.
मात्र आधीच काही वैद्यकीय समस्या असल्यास त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.
पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई, के आणि बी-१२ भरपूर प्रमाणात असते. विशेषतः व्हिटॅमिन डी चा हा एक उत्तम नैसर्गिक स्रोत आहे.
यामध्ये 'ल्युटीन' आणि 'झेक्झांथिन' हे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे वाढत्या वयासोबत डोळे कमकुवत होण्यापासून वाचवतात.
यात 'कोलीन' नावाचे पोषक तत्व असते, जे मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
पूर्वी असा समज होता की पिवळ्या बलकामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयाला धोका निर्माण होतो.