Team Agrowon
केशर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर काश्मीर उभे राहते. कारण केशरची लागवड भारतात काश्मीरमध्ये होते.
आपण जे केशर म्हणून वापरतो, ते असतात फुलांतील वाळवलेला लाल स्टिग्मा. त्यामध्ये १५० पेक्षा अधिक संप्लवनशील (म्हणजे त्वरित हवेत उडून जाणारी) आणि सुगंधी द्रव्ये असतात. उदा. टर्पेन्स, टर्पेन अल्कोहोल आणि त्यांचे इस्टर.
फुलामध्ये पिवळ्या रंगाचे परागदांडे असतात. त्याचा वापरही प्रोटिन्स, औषध आणि सौदर्यप्रसाधनामध्ये होतो.
एका कंदापासून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात साधारणपणे तीन फुले मिळतात. डिसेंबरपासून कंद माध्यमामध्ये वाढण्यासाठी सोडले जातात. त्यापासून मार्चमध्ये आणखी चार कंद मिळतात.
मार्च ते ऑगस्टपर्यंत कंदाची सुप्तावस्था असते. पारंपरिक शेतकरी नवीन तयार झालेल्या लहान कंदांना एक वर्षापर्यंत शेतातच राहू देतात.
एका कंदापासून हंगामामध्ये तीन फुले आणि चार कंद मिळतात. मूळचा कंदही सामान्यतः आठ वर्षापर्यंत वापरता येतो.
दर्जानूसार केशरला प्रती ग्रॅमसाठी ५०० ते १००० रुपयांपर्यंत भाव मिळतो.