Anuradha Vipat
केसांच्या आरोग्यासाठी अंड्याचा हेअर मास्क अत्यंत प्रभावी मानला जातो.
अंड्यामध्ये प्रथिने, खनिजे आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात.
अंड्यातील 'बायोटिन' आणि प्रथिने केसांच्या मुळांना पोषण देतात ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते.
अंड्यातील पोषक घटक टाळूला मजबूत करतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते.
अंडी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतात. यामुळे कोरडे आणि निर्जीव केस मऊ, रेशमी आणि चमकदार होतात
अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये ल्युटीन असते, जे केसांना हायड्रेट करते
अंड्यातील ल्युटीन केसांची लवचिकता वाढवून केस तुटण्यापासून वाचवते