Anuradha Vipat
हिवाळ्यात शरीर आतून ऊबदार ठेवण्यासाठी बाजरीचे सूप हा एक अत्यंत आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय आहे.
बाजरीचा गरम असल्याने ती थंडीच्या दिवसात शरीरासाठी वरदान ठरते.
बाजरीच्या उष्ण गुणामुळे शरीरातील तापमान टिकून राहते आणि थंडी वाजत नाही.
बाजरीमध्ये भरपूर फायबर असते, जे हिवाळ्यातील बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.
बाजरीमध्ये लोह आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे थकवा दूर होऊन त्वरित ऊर्जा मिळते.
हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांसाठी बाजरीचे सूप अत्यंत फायदेशीर आहे .
फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.