Anuradha Vipat
सततच्या किंवा दीर्घकालीन ताणतणावामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
ताणतणावाचा आपल्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत, शरीराच्या प्रत्येक अवयवावर गंभीर आणि नकारात्मक परिणाम होतो.
तणावामुळे कपाळाच्या आणि मानेच्या स्नायूंमध्ये ताण निर्माण होऊन सतत डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास सुरू होतो.
तीव्र तणावामुळे झोप न येणे , विसरभोळेपणा, एकाग्रता न होणे आणि कालांतराने डिप्रेशन येण्याचा धोका वाढतो.
तणावाच्या स्थितीत हृदयाचे ठोके वेगाने वाढतात आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.
दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते.
तणावामुळे अपचन, ॲसिडिटी, पोट फुगणे, बद्धकोष्टता किंवा अतिसार यांसारख्या समस्या उद्भवतात.