Anuradha Vipat
अल्कोहोल शरीरात गेल्यानंतर त्याचे परिणाम काही मिनिटांतच सुरू होतात.
अल्कोहोल पोटात गेल्यावर सुमारे २०% भाग थेट जठराच्या भिंतींद्वारे रक्तात शोषला जातो, तर उर्वरित ८०% लहान आतड्यातून रक्तात जातो.
रक्तप्रवाहाद्वारे अल्कोहोल मेंदूर्यंत पोहोचते. ज्यामुळे सुरुवातीला आनंद किंवा उत्साह वाटतो.
अल्कोहोलमुळे मेंदूच्या संदेशवहनाची गती मंदावते, ज्यामुळे बोलणे अडखळणे, नीट चालता न येणे आणि निर्णयक्षमता कमी होणे असे बदल होतात.
यकृत अल्कोहोलचे रूपांतर 'ॲसिटाल्डिहाइड' नावाच्या विषारी घटकात करते. जास्त प्रमाणात प्यायल्यास यकृतावर सूज येऊ शकते.
अल्कोहोल शरीरातील पाणी लघवीवाटे बाहेर काढते. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
अल्कोहोलमुळे रक्तवाहिन्या विस्तारतात, ज्यामुळे सुरुवातीला त्वचा गरम वाटते किंवा चेहरा लाल होतो.