Anuradha Vipat
रासायनिक ट्रिटमेंट्सशिवाय दूध, केळी, कोरफड आणि मुलतानी माती यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून केस घरच्या घरी सुरक्षितपणे आणि नैसर्गिकरीत्या हलके सरळ करता येतात.
हे घरगुती उपाय केसांचे नुकसान न करता त्यांना मऊ, चमकदार आणि सरळ लुक देण्यास मदत करतात.
अर्धा कप कच्च्या दुधामध्ये २ चमचे खोबरेल तेल मिसळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. हा स्प्रे केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत मारून अर्धा तास तसाच ठेवा
एक पिकलेले केळे आणि अर्धी वाटी पिकलेली पपई एकत्र चांगली कुस्करून घ्या. त्यात १ चमचा मध मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट केसांवर ४५ मिनिटे लावून ठेवा.
एक वाटी मुलतानी मातीमध्ये एका अंड्याचा पांढरा भाग आणि थोडेसे दूध मिसळून एकसर पेस्ट तयार करा. हा पॅक केसांना लावून सुकल्यानंतर पाण्याने धुवून टाका.
अर्धा कप कोमट ऑलिव्ह ऑइलमध्ये ४ चमचे ताजे कोरफड जेल मिसळा. या मिश्रणाने केसांना मसाज करा आणि १ तासानंतर केस माइल्ड शॅम्पूने धुवून घ्या.
घरगुती उपायांचे परिणाम हळूहळू आणि नैसर्गिक असतात. हे उपाय सलूनमधील रासायनिक स्ट्रेटनिंगसारखे केस पूर्णपणे कडक सरळ करत नाहीत.