Team Agrowon
ऊस वाढ आणि जमिनीतील ओलावा यांचे फार घनिष्ठ संबंध आहेत. लागवड भारी जमिनीत केल्यास पाण्याचा ताण हे पीक सहन करू शकते.
उगवणीचा कालावधी, फुटवे फुटण्याची अवस्था, मुख्य वाढीचा काळ आणि ऊस पक्व होण्याचा कालावधी या अवस्थांमध्ये पाणी नियोजन गरजेचे आहे.
फुटवे फुटणे आणि मुख्य वाढीचा काळ मार्च ते मे या प्रदीर्घ उन्हाळ्यात महिन्यांमध्ये पाण्याचा ताण पडतो. पयार्याने ४ ते ५ कांडी आखूड पडतात.
पावसाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा लांब कांडी पडतात. म्हणून या महिन्यात उसाच्या मुळाच्या सान्निध्यात पुरेशी ओल ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
जमिनीच्या प्रकारानुसार ज्यांच्याकडे पुरेसे पाणी आहे. त्यांनी उन्हाळी हंगामात पाण्याचे नियोजन करावे.
संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडला आणि नंतरच्या अवस्थेत भरपूर पाणी दिले तरी नुकसान भरून येत नाही.
वाफसा परिस्थितीतील उपलब्ध ओलावा ५० टक्के कमी झाल्यावर उसालापाणी द्यावे.