Anuradha Vipat
श्रावणात केस गळती थांबवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. चला तर मग पाहूयायात केस गळती थांबवण्यासाठी उपाय.
नारळ तेल केसांना पोषण देते आणि केसगळती कमी करते. नारळ तेल गरम करून केसांना मसाज करा
कडुलिंब टाळूच्या संसर्गामुळे होणारी केसगळती थांबवतात. कडुलिंबाच्या पानांची पेस्ट केसांना आणि टाळूला लावा
आहारात प्रथिने, व्हिटॅमिन आणि खनिजे यांचा समावेश करा.
तणावामुळे केस गळण्याची समस्या वाढू शकते. त्यामुळे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
आवळा केसगळती थांबवण्यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे. आवळा केसांच्या वाढीसाठी आणि मुळांना मजबूत करण्यासाठी खूप महत्वाचे आहे.
केस नियमितपणे धुवा. केस धुण्यासाठी कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा.