Team Agrowon
रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.
करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये याच्या सेवनाचा फायदा दिसून येतो. ‘क’ जीवनसत्त्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार कमी होतात.
सूर्याच्या प्रखर उष्णतेने जर शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत प्यावे.
करवंदामध्ये तंतू भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तसेच आंबट ढेकर येत असतील, तर अशा अवस्थेत करवंदाचे सरबत थोड्या-थोढ्या अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.