Caster Oil : अनेक शारिरीक समस्यांवर गुणकारी एरंडीची पाने, मूळ, बियांचे तेल

Team Agrowon

एरंड वनस्पतीची पाने, मूळ, बिया, एरंडापासून मिळणारे तेल या सर्वच उपयोगी असतात. ही वनस्पती सहज उपलब्ध होते.

Caster Oil | Agrowon

एरंड प्रामुख्याने वातनाशक असल्याने संधिवात, गुडघेदुखी इत्यादी वातविकारांत उत्तम कार्य करते. सांध्यावर वेदना होत असल्यास, एरंडाची पाने गरम करून त्याजागी बांधावीत.

Caster Oil | Agrowon

बऱ्याचदा फक्त बाह्योपचार करून वाताच्या तक्रारी, संधिवात यांवर आराम मिळत नाही. अशावेळी एरंड मुळांचा काढा पोटात घेतल्यास उपयोग होतो. एरंड मुळाची भरड पावडर काष्ठौषधीच्या दुकानात उपलब्ध होते.

Caster Oil | Agrowon

अवेळी जेवण, सतत बसून काम करणे, व्यायाम न करणे यामुळे बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होण्याची तक्रार जाणवते. शिवाय शौचाला खडा होतो. अशावेळी एरंड तेल एक चमचा प्रमाणात रात्री झोपताना घ्यावे. त्यामुळे आतड्यात स्निग्धपणा येऊन वात कमी होतो. आणि पोट साफ होण्यास मदत होते.

Caster Oil | Agrowon

वातामुळे बऱ्याचदा टाच खूप दुखते. त्यावर एरंड तेल चोळून शेक दिल्यास आराम मिळतो.

Caster Oil | Agrowon

बाळंतिणीमध्ये स्तनप्रदेशी वेदना होतात. अशावेळी एरंडाच्या पानांनी शेकावे. त्या वेदना दुधामुळे असतील आणि सूज असेल तर नक्की चांगला फायदा होतो.

Caster Oil | Agrowon

ही माहिती सामान्य माहितीवर अवलंबून असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Caster Oil | Agrowon

Sugarcane Water Management : असं करा उसासाठी पाण्याचं नियोजन

आणखी पाहा...