Anuradha Vipat
चिकनगुनिया हा डासांमुळे होणारा एक धोकादायक व्हायरल ताप आहे, ज्यामध्ये रुग्णाला तीव्र ताप येण्यासोबतच हात-पायांच्या सांध्यांमध्ये प्रचंड वेदना होतात.
चिकनगुनिया या आजारातून बरे झाल्यानंतरही सांधेदुखी अनेक महिने सतावत राहते.
चिकनगुनियात औषधोपचारांसोबतच काही पारंपारिक आणि आयुर्वेदिक काढ्यांचे सेवन केल्यास शरीराला झटपट आराम मिळतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
गुळवेल ही कोणत्याही व्हायरल तापावर रामबाण औषध मानली जाते. हा काढा शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यास, ताप कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतो.
गुळवेलीचा छोटा तुकडा किंवा पावडर एका ग्लास पाण्यात तुळशीची पाने घालून अर्धे पाणी होईपर्यंत उकळा आणि गाळून कोमट प्या.
पपईची पाने शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वेगाने वाढवण्यासाठी ओळखली जातात, तर आले सांध्यांमधील सूज आणि वेदना कमी करते.
चिकनगुनिया मधील सांधेदुखीवर हा काढा अत्यंत गुणकारी आहे. मेथी दाण्यांमध्ये सूज कमी करणारे गुणधर्म असतात जे सांध्यांचे जडत्व कमी करतात.