Skin Brightening : चेहऱ्यावरील काळपटपणा आणि टॅनिंग एका झटक्यात दूर करतील 'हे' रामबाण घरगुती उपाय

Anuradha Vipat

निस्तेज आणि काळा

ऊन्हाचे चटके, धूळ, प्रदूषण किंवा पोषणाच्या कमतरतेमुळे चेहरा निस्तेज आणि काळा पडतो.

Skin Brightening | Agrowon

रंग आणि तजेला

महागड्या केमिकल क्रीम्सऐवजी स्वयंपाकघरातील खालील सोप्या उपायांचा नियमित वापर केल्यास त्वचेचा नैसर्गिक रंग आणि तजेला परत येण्यास मदत होते.

Skin Brightening | Agrowon

बेसन, हळद आणि दही फेसपॅक

२ चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि १ ते २ चमचे घट्ट दही एकत्र करून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी हलक्या हाताने स्क्रब करत धुवा.

Skin Brightening | agrowon

कच्च्या बटाट्याचा रस

कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढा. कापसाच्या मदतीने हा रस चेहऱ्यावर लावा आणि १५ ते २० मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा.

Skin Brightening | agrowon

टोमॅटोचा गर आणि साखर स्क्रब

टोमॅटो कापून त्यावर थोडी बारीक साखर टाका आणि चेहऱ्यावर २ ते ३ मिनिटे हलक्या हाताने चोळा. १० मिनिटांनंतर चेहरा धुवा.

Skin Brightening | agrowon

कोरफड जेल आणि गुलाबपाणी

रात्री झोपण्यापूर्वी ताज्या कोरफडीचा गर आणि काही थेंब गुलाबपाणी एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या.

Skin Brightening | Agrowon

पपई आणि मधाचा पॅक

पिकलेल्या पपईचे २-३ तुकडे कुस्करून त्यात १ चमचा मध मिसळा. चेहऱ्यावर २० मिनिटे लावून कोमट पाण्याने धुवा.

Skin Brightening | agrowon

Migraine Trigger Foods : 'हे' पदार्थ खाल्ल्याने तुमची डोकेदुखी आणि मायग्रेन वाढू शकते!

Migraine Trigger Foods | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...