Anuradha Vipat
लिंबू आणि खोबरेल तेल सम प्रमाणात मिसळून टाळूला मसाज करा आणि अर्धा तास तसेच ठेवा
दह्यामध्ये असलेले ऍसिड आणि प्रोबायोटिक्स कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. दह्याला टाळूवर लावून अर्धा तास तसेच ठेवा आणि नंतर केस धुवा.
बेकिंग सोडा एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे, जो कोंडा कमी करण्यास मदत करतो. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा आणि टाळूला लावा.
टी ट्री ऑइलमध्ये अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे कोंड्यासाठी कारणीभूत असलेल्या बुरशीला मारण्यास मदत करतात.
कडुलींबात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यावर त्याने केस धुवा.
मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून केसांना आणि टाळूला लावा. यामुळे कोंडा कमी होतो.
कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते जे कोंडा कमी करण्यास मदत करते. कांद्याचा रस काढून टाळूला लावा