Anuradha Vipat
व्हाईट हेड्सची समस्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत.
मध आणि दालचिनी समप्रमाणत मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटे ठेवून चेहरा धुवा. दालचिनी छिद्र कमी करण्यास मदत करते.
टी ट्री ऑइलचे काही थेंब खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून घ्या. कापसाच्या मदतीने व्हाईट हेड्सवर लावा आणि रात्रभर ठेवून सकाळी चेहरा धुवा.
लसणाच्या पाकळ्या बारीक करून त्याचा रस व्हाईट हेड्सवर लावा. यामुळे बॅक्टेरिया कमी होऊन व्हाईट हेड्स कमी होण्यास मदत होईल.
मध एक नैसर्गिक उपाय आहे. मध थेट त्वचेवर लावून 15 मिनिटांनी धुवा.
साखर किंवा कॉफीचा वापर करून त्वचा स्क्रब करा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि व्हाईट हेड्स कमी होतात.
व्हाइट हेड्ससाठी कोणताही उपाय वापरत असाल तर, त्वचेला सूर्यप्रकाशात येण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.