Anuradha Vipat
शरीरातील वाढलेले बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी घरगुती उपाय आणि योग्य आहार अत्यंत प्रभावी ठरतात.
औषधांसोबतच जीवनशैलीत बदल करून तुम्ही कोलेस्टेरॉल सहज कमी करू शकता.
रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या २ ते ३ पाकळ्या कोमट पाण्यासोबत चघळवून खा. लसूण जे बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते आणि रक्तप्रवाह सुधारते.
मेथीमधील फायबर आणि संयुगे यकृताला अतिरिक्त कोलेस्टेरॉल शोषण्यापासून रोखतात.
सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स किंवा दलियाचा समावेश करा.ओट्समध्ये 'बीटा-ग्लुकन' नावाचे विद्राव्य फायबर असते, जे आतड्यांमधून कोलेस्टेरॉल शोषून शरीराबाहेर टाकण्यास मदत करते.
१ ग्लास कोमट पाण्यात १ चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळून रोज सकाळी प्या. हे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळवण्यास आणि रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करते.
अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे गुड कोलेस्टेरॉल वाढवतात.