DRR Paddy 48 : प्रभावी डीआरआर धान-४८, नोकरी सोडून तयार केली भाताची नवी जात

sandeep Shirguppe

प्रयोगशील शेतकरी

कोल्हापूरचे युवा शेतकरी अभिजित पाटील यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांना एकत्र करून २०१९ मध्ये नॅचरल फार्म्स ॲण्ड ॲग्रो प्रॉडक्ट प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडची स्थापना केली.

DRR Paddy 48 | agrowon

नोकरी सोडून कंपनीची स्थापना

माध्यमात करणारे पाटील यांनी कोरोना काळात नोकरी सोडून दिल्यानंतर त्‍यांनी ओळखीच्या शेतकऱ्यांच्या साह्याने शेतकरी उत्पादक कंपनीची स्‍थापना केली.

DRR Paddy 48 | agrowon

भाताचे नवीन वाण

हैदराबाद येथील भारतीय भात संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अरुण सोनराज यांची भेट घेऊन त्यांनी नवीन जातीच्या लागवडीला चालना मिळाली.

DRR Paddy 48 | agrowon

डीआरआर धान-४८ वाण

अभिजित पाटील २०२१ मध्ये डॉ. अरुण सोनराज यांच्या सल्ल्यानुसार जस्ताने समृद्ध असलेली मूल्यवर्धित (बायोफोर्टिफाइड) डीआरआर धान-४८ या जातीचे बियाणे आणले.

DRR Paddy 48 | agrowon

भात उत्पादकांना बियाणे

चंदगड, कागल आणि राधानगरी तालुक्यांतील प्रयोगशील भात उत्पादकांना हे बियाणे दिले. उपलब्ध बियाण्यातून १७ गुंठे क्षेत्रावर लागवड केली.

DRR Paddy 48 | agrowon

पानांना पिवळा कलर

नेहमीच्या भात जातींच्या पानांचा रंग गडद हिरवा असतो. मात्र डीआरआर धान-४८ जातीच्या पानांना थोडी पिवळी झाक आहे.

DRR Paddy 48 | agrowon

८ एकर लागवड

२०२२ मध्ये उपलब्ध बियाण्यातून एक एकर क्षेत्रावर लागवड केली. यंदाच्या वर्षी ३४ शेतकऱ्यांनी आठ एकरांवर लागवड केली.

DRR Paddy 48 | agrowon

एकरी २२ क्विंटल उत्पादन

या जातीचे एकरी सरासरी २२ क्विंटल उत्पादन मिळाले. यातून १७६ क्विंटल भात बियाणे तयार झाले आहे.

DRR Paddy 48 | agrowon

सुधारित तंत्रज्ञानापासून वाण

डीआरआर धान-४८ या जातीच्या वैशिष्ट्यांबाबत अभिजित पाटील म्हणाले, की भाताची ही जात सुधारित तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आली आहे.

DRR Paddy 48 | agrowon

मजबूत देठ

ही जात १३५ ते १४० दिवसांत तयार होते. मजबूत देठ, मोठी पाने आहेत. ही जात रोगप्रतिकारक आणि पाण्याचा ताण सहन करणारी आहे.

DRR Paddy 48 | agrowon

लोंभ्या चांगल्या

लोंब्या देखील चांगल्या भरतात. त्यामुळे उत्पादनात वाढ मिळाली आहे. दाणा बारीक असल्याने ग्राहकांची पसंती आहे.

DRR Paddy 48 | agrowon

शेतकऱ्यांची पसंती

पॉलिश केलेल्या तांदळात २१ पीपीएम आणि पॉलिश न केलेल्या तांदळात २५ पीपीएम जस्ताचे प्रमाण मिळाले आहे. लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून या बियाण्यास पसंती मिळाली आहे.

DRR Paddy 48 | agrowon