Edible Oil Market : खाद्यतेल आयात वाढली; शेतकऱ्यांसमोर अडचण

Team Agrowon

वाढत्या खाद्यतेल आयातीमुळे केवळ आपल्या सोयाबीनचे भाव पडले नाहीत. आयात वाढल्याचा एवढा मर्यादीत परिणाम नाही तर दीर्घकाळात मोठे संकट येऊ शकतं.

Edible Oil | Agrowon

सरकारचं धोरणं असचं राहीलं तर केवळ सोयाबीन उत्पादकांवरच संकट वाढणार नाही तर देशाची खाद्यतेल सुरक्षाच संकटात येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Edible Oil | Agrowon

भारताने देशातील भाव पाडायच्या नादात सोयाबीन उत्पादकांना देशोधडीला लावलं. देशात विक्रमी आयात होऊन खाद्यतेल स्वस्त झालं.

Edible Oil | Agrowon

यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले. पण सरकारच्या या निर्णयाचा फायदा झाला इंडोनेशिया आणि मलेशियातील पाम उत्पादकांना, ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादकांना, तसेच रशिया आणि युक्रेनमधील सूर्यफूल उत्पादकांना.

Edible Oil | Agrowon

आपल्या सोयाबीनचे भाव मात्र ५ हजारांच्या पुढे गेलेच नाहीत. पण सरकारला याची पर्वा दिसत नाही. कारण म्हणजे ही आयात अजूनही कमी होत नाहीये.

Edible Oil | Agrowon

खाद्यतेलावरील आयातशुल्क कमी केल्याने देशात विक्रमी आयात झाली. २०२२-२३ च्या तेल विपणन वर्षात म्हणजेच नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या काळात खाद्यतेल आयात वाढून १६४ लाख टनांवर पोचली.

Edible Oil | Agrowon
क्लिक करा