Anuradha Vipat
पूजेची किंवा घरातील वाळलेली फुले फेकून न देता आपण त्यापासून घरच्या घरी सुगंधित धूप आणि सेंद्रिय खत बनवू शकता.
वाळलेल्या फुलांच्या पाकळ्या, कापूर,गुग्गुळ किंवा लोबान ,शुद्ध गाईचे तूप,चंदन पावडर किंवा लाकडाचा भुसा,आवडीचे सुगंधी तेल किंवा भीमसेनी कापूर.
सर्वप्रथम गोळा केलेली फुले उन्हात पूर्णपणे वाळवून घ्या. ही सुकलेली फुले मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पावडर बनवून घ्या.
या फुलांच्या पावडरमध्ये कापूर, गुग्गुळ, लोबान आणि चंदन पावडर व्यवस्थित मिक्स करा.
आता या कोरड्या मिश्रणात थोडे थोडे गाईचे तूप (किंवा थोडे पाणी/मध) घालून ते पिठासारखे घट्ट मळून घ्या.
या तयार मिश्रणाला आपल्या हाताने धूपाचा (कोन किंवा काडीचा) आकार द्या.
हे तयार केलेले धूप २ ते ३ दिवस उन्हात चांगले वाळू द्या. तुमचा घरगुती, केमिकल-मुक्त सुगंधित धूप तयार आहे!