Aslam Abdul Shanedivan
आपल्या आरोग्यासाठी लवंग अतिशय फायदेमंद असून याच्या सेवनाने अनेक फायदे मिळतात.
पण, लवंग अती खाल्ल्याने किंवा अतिरेक केल्यास आपल्या शरीरासाठी हानिकारक देखील ठरू शकते.
पण याच्या अति वापर केल्यास अनेक प्रकारचे तोटे सहन करावे लागतात असे डायटीशियन आयुषी यादव यांचा दावा आहे
आहारतज्ज्ञ आयुषी यांच्या मते जास्त लवंग खाल्यास यातील युजेनॉल घटकामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
लवंगातील युजेनॉल घटकामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणाही येऊ शकतो.
तोंडात अल्सर आला असेल तर लवंगचा आस्वाद घेऊ नये. यामुळे तोंडात वेदना, सूज आणि रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते
सतत आणि अति लवंग खाल्यास बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, अतिसार आणि उलट्या अशा पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.