Mahesh Gaikwad
करटुले ही एक रानभाजी असून याला कोवळी हिरव्या रंगाची कारल्यासारखी दिसणारी फळे येतात. याची चव कडसर असून त्याची भाजी बनवून खातात.
याशिवाय करटुल्याची पाने, फुले, आणि कंदयुक्त मुळे यांचाही वापर आहारात केला जातो. करटुल्याची भाजी खाल्ल्याने आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळतो.
करटुल्यामध्ये लोह आणि प्रथिने यांचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. तर, कॅलरीजचे प्रमाण कमी असते. तसेच यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट तत्त्वही असतात.
करटुल्याचे सेवन केल्यामुळे पोटाच्या संबंधित समस्या जसे की, बध्दकोष्ठ, अपचन या सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्यांसाठी करटुले खाणे फायदेशीर आहे. कारल्याप्रमाणे ताज्या करटुल्याच्या फळांचा ज्यूस प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी-खोकल्याचे व्हायरल इन्फेक्शनचे आजार होत असतात. अशावेळी इन्फेक्शनपासून बचावासाठी करटुले खाणे फायदेशीर आहे.
करटुल्यामध्ये अँटी-अॅलर्जी, अँटीऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरिअल, एनालजेसिक आणि अँटी-इन्फालमेटरी गुणधर्म असतात, जे आपले आरोग्य निरोगी ठेवण्याास मदत करतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे करटुल्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी आहारात या भाजीचा समावेश आवश्यक आहे.
ताज्या करटुल्याचा रस चेहऱ्यावरील मुरूम आणि काळ्या डागांवर लावल्याने फायदा होतो. तर एक्झिमासारख्या त्वचेच्या करटुल्याच्या भाजलेल्या बिया फायदेशीर असतात. ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे.