Aslam Abdul Shanedivan
चांगले आरोग्य आणि तंदुरुस्ती राखण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती खूप महत्वाची असते
तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात पोषक आहाराची महत्वाची भूमिका असते. जे रोग प्रतिकारशक्ती वाढवतात
चांगल्या आरोग्यासाठी ड्राय फ्रूट्स आणि काही बिया चांगल्या असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
ओमेगा-३ फॅटी ऍसिडच्या उच्च प्रमाणासाठी अक्रोड ओळखले जाते. जे मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. अक्रोड भिजवल्याने ओमेगा-३ ची उपलब्धता सुधारते, ज्यामुळे हृदयाच्या आरोग्याला चालना मिळते.
पेपिटास बिया यामध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असते. पेपिटास बिया भिजवल्याने फायटिक ऍसिड कमी होण्यास मदत होते. यातील अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ यांच्याशी लढण्यास मदत करतात.
व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि निरोगी चरबीचा समृद्ध स्रोत म्हणून बदाम खाल्ले जाते. बदाम रात्रभर भिजवून खाल्ल्याल व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंटची क्षमता वाढते.
चिया बिया आरोग्याच्या दृष्टीने खूप शक्तिशाली असून यात फायबर, ओमेगा -३, फॅटी ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. पाण्यात भिजवल्यावर त्या शरीराला हायड्रेट करण्यास देखील मदत करतात.