Mahesh Gaikwad
टाईमपास म्हणून खाण्याच्या पदार्थांमध्ये अनेकांना फुटाणे खायला आवडते. वास्तविक पाहता फुटाणे म्हणजे विविध प्रकारच्या व्हिटामिन्सचा खजिनाच आहेत.
फुटाणे खाल्ल्यामुळे शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून निघण्यास मदत होते. फुटाण्यांमध्ये जीवनसत्त्वांव्यतिरीक्त कॅल्शिअम, झिंक, लोह, यासारखे आरोग्यासाठी पोषक असणारे घटक आढळतात.
फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामिन-बी असते. फुटाणे खाल्ल्याने शरीरातील व्हिटामिन-बीची कमतरता दूर होण्यास मदत होते.
फुटाण्यांचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटामिन-ए ची कमी दूर होते. तसेच यातील पोषक घटकांमुळे शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते.
फुटाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटामिन-सी, ई आणि व्हिटामिन- के असते. स्नायूंना बळकट करण्यासाठी याचा फायदा होतो.
तसेच फुटाण्यांमध्ये फायबर घटक मुबलक प्रमाणात असल्याने याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. फुटाणे खाल्ल्यामुळे दिर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.
तसेच फुटाण्यांमध्ये कॅल्शिअम आणि अँटीऑक्सिडंट यासारखे घटकही असतात. यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होतात. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.