sandeep Shirguppe
कच्चा लसूण खाण्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. रोज दोन कुड्या लसणाच्या खाव्यात.
लसूणात अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेला 'अलिसिन' नावाचा एन्झाइम असतो.
व्हिटॅमिन A, B, आणि C, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि सेलेनियम लसणात भरपूर असतात.
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा उजळते.
वजन कमी करण्यास तसेच मधुमेह आणि खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठीही लसणाचा उपयोग होतो.
ब्लड प्रेशर नियंत्रण, हृदयाचे आरोग्य सुधारणे आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होण्यासाठी लसूण खावे.
स्वयंपाक केल्याने लसणातील काही फायदेशीर संयुगांची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे कच्चा लसूण खावा.
लसूण खाल्ल्याने तोंडाची दुर्गंधी, छातीत जळजळ, पोटाच्या समस्या आणि इतर अप्रिय दुष्परिणाम होऊ शकतात.