Anuradha Vipat
हृदयविकार आणि हाय कोलेस्टेरॉलच्या वाढत्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोजच्या आहारात डाळींचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.
डाळी केवळ प्रोटीनचा स्त्रोत नसून त्या हृदयाचे आरोग्य राखणारे अनेक महत्त्वाचे पोषक घटक पुरवतात.
डाळींमध्ये विद्राव्य फायबर भरपूर प्रमाणात असते. हे फायबर रक्तवाहिन्यांमध्ये साठलेले बॅड कोलेस्टेरॉल शोषून शरीराबाहेर टाकण्यास मदत करते.
डाळींमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. हे दोन्ही घटक रक्तदाब सामान्य राखतात.
डाळींमध्ये फोलिक ॲसिड असते. हे शरीरातील 'होमोसिस्टीन' नावाचे हानिकारक अमिनो ॲसिड कमी करते, ज्यामुळे हृदयाच्या नसा ब्लॉक होण्याचा धोका कमी होतो.
यातील अँटी-ऑक्सिडंट्स हृदय आणि रक्तवाहिन्यांची सूज कमी करतात. तसेच, यातील हाय-प्रोटीनमुळे वजन नियंत्रणात राहून हृदयावरील ताण कमी होतो.
डाळींचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.