Anuradha Vipat
उन्हाळ्यात बाजरीची भाकरी खाताना थोडी काळजी घेणे आवश्यक असते. बाजरीचा स्वभाव 'उष्ण' असतो.
बाजरी शरीर गरम ठेवण्यास मदत करते, त्यामुळे उन्हाळ्यात ती अति प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते.
बाजरी अति प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढून मूळव्याध, नाकातून रक्त येणे किंवा पोटातील जळजळ असे त्रास होऊ शकतात.
बाजरी पचायला जड असते. त्यामुळे बाजरीमुळे अपचन किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यासाठी ज्वारीची भाकरी सर्वात उत्तम मानली जाते, कारण ज्वारीचा स्वभाव 'थंड' असतो.
बाजरीची भाकरी ताकासोबत किंवा दह्यासोबत खावी, ज्यामुळे तिची उष्णता कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात आठवड्यातून फक्त १-२ वेळाच बाजरी खावी. भाकरीसोबत भरपूर पाणी किंवा कोशिंबीर खावी.