sandeep Shirguppe
हिवाळ्यात संत्री योग्य पद्धतीने खाल्यास मिळतात अनेक आरोग्यदायी फायदे.
हिवाळ्यात संत्री खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो.
मुबलक प्रमाणात फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते तर पोटॅशियम हृदयाला निरोगी ठेवते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी यासाठी संत्र्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी त्वचेला आर्द्रता देतात.
हिवाळ्यात अनेक आजारांचा धोका वाढतो, यापासून बचाव करण्यासाठी संत्र्याचे सेवन हा एक चांगला पर्याय आहे.
हिवाळ्यात जड जेवणानंतर संत्र्याचे सेवन केल्याने पोट हलके आणि आरामदायी वाटते.
संत्रा कमी-कॅलरी असलेले फळ आहे. जे वजन कमी करण्यासाठी आदर्श आहे.