sandeep Shirguppe
बाजरीची भाकरी आरोग्यदायी गुणांनी समृद्ध आहे, या भाकरीसोबत गूळ खाल्ल्यास अनेक लाभ होतात.
बाजरी आणि गुळामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात, प्रोटीन, फायबर, पॉटेशियम, फॉस्फरस, आर्यनही मिळते.
बाजरी,गूळ या दोन्हीत कार्बोहायड्रेट असल्याने शरीराला बराच काळ ऊर्जा देतात.
बाजरीतले फायबर आणि गुळातील डिटॉक्सिफाईंग गुणामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
बाजरी आणि गुळात आर्यनचे प्रमाण असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते.
बाजरीत कॅल्शियम आणि गुळात पोटॅशियम असल्याने हाडे मजबूत होतात.
बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी ६, कॅल्शियम, लोह भरपूर प्रमाणात असतं.
बाजरीची भाकरी उष्ण असते. त्यामुळे हिवाळ्यात ती आवर्जून खाल्लीच पाहिजे.