Anuradha Vipat
केळीच्या पानावर जेवण करणे ही केवळ एक भारतीय परंपरा नसून त्यामागे अनेक आरोग्यदायी आणि वैज्ञानिक कारणे आहेत.
आज आपण पाहूयात आजच्या आधुनिक काळातही केळीच्या पानावर जेवण्याचे कोणते फायदे आहेत.
केळीच्या पानावर जेवल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
केळीच्या पानावरील मेणासारखा पातळ थर अन्नातील सूक्ष्म जंतू आणि धूळ नष्ट करण्यास मदत करतो.
केळीच्या पानावर जेवल्याने अन्नाला एक विशिष्ट आणि मधुर सुगंध प्राप्त होतो. यामुळे जेवणाची चव अधिक वाढते .
पानातील नैसर्गिक पोषक तत्वे अन्नासोबत शरीरात गेल्यामुळे पचनक्रिया सुलभ होते.
आयुर्वेदानुसार, केळीच्या पानावर जेवल्याने पोटाचे विकार कमी होतात.