Mahesh Gaikwad
अनेकांना सकाळी-सकाळी उपाशीपोटीच काही ना काही खाण्याची सवय असते. परंतु या सवयीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले, तरी उपाशीपोटी दही खाण्यामुळे आम्लता आणि गॅसची समस्या होवू शकते. थंडीच्या दिवसांत तर दही खाणे टाळले पाहिजे.
उपाशीपोटी केळी खाल्ल्यामुळे शरीरातील मॅग्नेशिअमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे ह्रदयावर ताण येऊ शकतो. ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांना उपाशीपोटी केळ खाताना खबरदारी घ्यायला हवी.
मोसंबी, संत्री आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गिय फळांमध्ये आम्ल असते. उपाशीपोटी ही फळे खाल्ल्याने जठरामध्ये आम्लाचे प्रमाण वाढते आणि अॅसिडीटी होते.
अनेकांना सकाळी उठल्यावर चहा-कॉफी पिण्याची सवय असते. परंतु यामधील कॅफिनमुळे पचनक्रिया बिघडून अपचन, गॅस, जळजळ या सारख्या समस्या होतात.
उपाशीपोटी थंड पेय घेणे सक्तीने टाळले पाहिजे. यामुळे पचनसंस्था थंड पडते आणि पचनक्रिया मंदावते. तसेच गॅस, पोट दुखीच्या समस्या होतात.
उपाशीपोटी मिठाई किंवा साखरेचे गोड पदार्थ खाल्ल्यास रक्तातील इन्सुलिन अचानक वाढते. त्यामुळे थकवा आणि चक्कर येऊ शकते. डायबेटीसच्या रूग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी.
सकाळी उठल्यावनंतर कोमट पाणी प्यावे. त्यानंतर हलक्या स्वरूपाचा दिवसभर उर्जा देणारा आहार घ्यावा.