Anuradha Vipat
मसूर डाळ आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असून वजन नियंत्रणापासून ते त्वचेच्या सौंदर्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरते.
मसूर डाळीत भरपूर फायबर आणि पोटॅशियम असते. हे खराब कोलेस्टेरॉल कमी करून रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रणात राहते.
आहारातील फायबरमुळे बद्धकोष्टतेचा त्रास दूर होतो आणि पचनक्रिया सुलभ होते.
मसूर डाळीमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे अॅनिमियाचा त्रास कमी होतो.
मसूर डाळीचे पीठ चेहऱ्याला लावल्याने त्वचेचा रंग उजळतो आणि टॅनिंग दूर होते.