Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक कमी जेवण्याचा निर्णय घेतात.
कमी जेवण केल्याने शरीर जास्त प्रमाणात चरबी आणि वजन कमी होण्यास मदत होते असे नाही.
कमी जेवण आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. तर जाणून घेऊयात कमी जेवण्याचे तोटे
कमी जेवण केल्याने शरीराला आवश्यक असलेली महत्त्वाची पोषक तत्वे, प्रथिने, फायबर्स, विटामिन्स आणि मिनरल्स मिळत नाहीत.
कमी जेवण केल्याने शरीराची मेटाबॉलिझमची गती मंदावू शकते. त्यामुळे शरीरला पूर्ण ऊर्जा मिळत नाही
कमी जेवण केल्याने मेंदूवर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे तणाव आणि नैराश्याची समस्या निर्माण होते.
कमी जेवण केल्याने पचनसंस्थेमध्ये बिघाड होऊ शकतो. पचन प्रक्रिया हळू होऊ शकते.