sandeep Shirguppe
भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट यांच्या मते लसूण सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास अनेक फायदे होतात.
नियमित लसणाचे सेवन केल्याने बी ६ आणि सी जीवनसत्व मिळतात, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
लसूणमध्ये अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असल्याने अनोशीपोटी चावून खाल्ल्यास कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी कमी होईल.
मधुमेहात मदत करणाऱ्या लसूणमध्ये अॅलिसिन नावाचे कंपाऊंड असते, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
अंकूर आलेल्या लसणामुळे आपल्या शरिरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. तसेच याचं सेवन केल्यामुळे आपलं शरिर अनेक रोगांशी लढण्यासाठी सुसज्ज होतं.
अंकूर आलेल्या लसणामध्ये एँटी-ऑक्सिंडट प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणावर आढळते. यामुळे आपल्या शरिरातील तणाव कमी होतो.
लसणाच्या सेवनाने मन संतुलित राहते आणि डिप्रेशनशी लढण्याची ताकद मिळते.
भाजलेले लसूण खाणे हा उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे.