Mahesh Gaikwad
स्वयंपाक घरातल्या मसाल्याच्या डब्ब्यातील मसाले वेगेवेगळ्या आरोग्याच्या समस्यांवर अत्यंत गुणकारी असतात.
लसूण आणि मधाचे मिश्रण हे देखील अशाच प्रकारचे रामबाण औषध म्हणून वापरले जाते. यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळतो.
लसूण आणि मधामध्ये विविध प्रकारचे औषधी घटक आढळतात. मात्र, अनेकांना यांच्या आरोग्यासंबंधित फायद्याबद्दल माहित नसते.
लसणामध्ये अॅलिसीन, सल्फर असते. हे अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी भरपूर असते.
मधामध्ये नैसर्गिकत: अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. याशिवाय मधात अँटी इन्फ्लामेंटरी घटकांचा चांगला स्त्रोत आहे.
लसूण मधामध्ये भिजवून खाल्ल्यास शरिराला अँटीबॅक्टेरियल आणि अंटीफंगल गुणधर्म मिळतात.
लसूण मधात भिजवून खाल्ल्यामुळे याचा ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगला फायदा होतो.
सर्दी आणि खोकल्याच्या आजारामध्ये मध आणि लसूण खाल्ल्याने आराम मिळतो.
याशिवाय मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील मध आमि लसूण गुणकारी आहे.