Mahesh Gaikwad
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसांत बदलेल्या वातावरणामुळे आजार झपाट्याने परसरतात.
पावसाळ्याच्या दिवसांत आजारांपासून दूर राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
आजारांपासून बचावासाठी आहारामध्ये हंगामी फळे आणि भाज्या समावेश आवश्यक आहे. आज आपण या दिवसांमध्ये आहारात कोणती फळे खावी, याची माहिती पाहणार आहोत.
केवळ पावसाळ्यात मिळणारे जांभूळ आरोग्याच्या दृष्टीने हे एक असे फळ आहे, ज्याच्या बियासुध्दा आरोग्यासाठी गुणकारी असतात.
पावसाळ्यात ब्लॅकबेरी हे विदेशी फळ रक्तातील हिमोग्लोबिनची समस्या तसेच श्वसनाच्या समस्या यावर गुणकारी आहे. यामुळे ह्रदयविकारही कमी होतो.
पावसाळ्यात पपई खाणे फायदेशीर असते. यामुळे मधुमेह आणि ह्रदयाच्या आरोग्याच्या धोका कमी होतो.
तसेच पपईमध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे पोटाच्या संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
लिची हे देशी फळ असून ते उन्हाळ्यापासून पावसाळ्यापर्यंत बाजारात उपलब्ध असते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत आहे.