Anuradha Vipat
गोड पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात, परंतु पांढरी साखर आणि मैद्यामुळे वजन वाढणे, मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका निर्माण होतो.
जर आपण साखरेला निरोगी पर्यायांनी बदलले, तर आपण आरोग्याला हानी न पोहोचवता गोडाचा आनंद घेऊ शकतो.
गुळामध्ये लोह आणि फायबर भरपूर असते. हे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा देते.
खजूर हा गोडव्याचा सर्वात उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात.
मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
रिफाइंड साखरेपेक्षा खडीसाखर पचनासाठी हलकी आणि शरीराला थंडावा देणारी मानली जाते.
हे एका वनस्पतीचे पान असून यामध्ये झिरो कॅलरीज असतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा साखरेचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.